Ad will apear here
Next
हात निर्जंतुक करण्याची गरज सर्वप्रथम ओळखणारे डॉ. इग्नाझ सिमेलविस : गुगल डूडलला अॅनिमेटेड व्हिडिओ
डॉ. इग्नाझ सिमेलविसकरोना विषाणूने जगभर थैमान घातले असल्यामुळे सध्या हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व प्रत्येक माध्यमातून सांगितले जात आहे. आधुनिक जगात रोगप्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी हात निर्जंतुक करण्याचे महत्त्व सर्वप्रथम कोणी ओळखले असेल, तर ते होते हंगेरीचे डॉ. इग्नाझ सिमेलविस. हात धुण्याचे वैद्यकीय महत्त्व सर्वप्रथम ओळखणारी व्यक्ती असल्याचे श्रेय त्यांना दिले जाते. १९ मार्च १८४७ रोजी व्हिएन्ना जनरल हॉस्पिटलच्या प्रसूतिगृहात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तोपर्यंत बाळंतपणात होणारे माता आणि बालक मृत्यूचे प्रमाण खूप मोठे होते. डॉ. सिमेलविस यांनी त्यावर संशोधन केले आणि हातांच्या माध्यमातून जंतुसंसर्ग होत असल्याचा निष्कर्ष काढला. हात निर्जंतुक करून शस्त्रक्रिया केल्यास मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. 

सध्या करोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हात धुण्याची शास्त्रीय पद्धत वापरण्याची शिफारस केली आहे. या पद्धतीने हात कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक दाखविणारा, डॉ. सिमेलविस यांचे अॅनिमेशन असलेला ५० सेकंदांचा व्हिडिओ गुगलने आज डूडलवर प्रसारित केला आहे. तो व्हिडिओ सोबत देत आहोत. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZQMCK
Similar Posts
करोनाबाबत जनजागृतीसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचे व्हिडिओ लोकप्रिय अभिनेते, खासदार अमोल कोल्हे हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यामुळे एक डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी करोना विषाणूसंदर्भात जनजागृती करणारे काही व्हिडिओ तयार केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने हे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. करोना विषाणूशी लढण्याची पंचसूत्री, हात धुण्याची
करोना विषाणू : जगातील ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले.. करोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे; पण घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ५०.७ टक्के रुग्ण यातून बरे झाले आहेत, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची आकडेवारी सांगते. तसेच, जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ८०.९ टक्के रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत
करोना विषाणू : ‘हे’ शास्त्रीय मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का? करोना विषाणूमुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ (COVID-19) असे त्याचे नामकरण केले असून, जगभर त्याची साथ असल्याचे (पँडेमिक) जाहीर केले आहे. ही परिस्थिती काळजी वाटण्यासारखी आहे; मात्र सोशल मीडियासह अनेक माध्यमांतून ऐकीव किंवा अशास्त्रीय
करोना विषाणूबद्दलचे सहा गैरसमज आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली वस्तुस्थिती (मराठी व्हिडिओ) करोना विषाणूबद्दलचे सहा गैरसमज आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली वस्तुस्थिती याचा व्हिडिओ (मराठी सबटायटल्ससह) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language